भारत सरकारकडून ५४ चिनी ‘अॅप्स’वर बंदी !
नवी देहली – भारतियांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका असणार्या चीनच्या ५४ हून अधिक ‘अॅप्स’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. हे ‘अॅप्स’ वर्ष २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्या ‘ब्रँड’च्या नावाखाली नव्याने प्रकाशित केलेले आहेत. गूगलच्या ‘प्ले स्टोअर’सह अन्य प्रमुख ‘स्टोअर्स’नासुद्धा हे अॅप्स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारताने यापूर्वीही चीनच्या २५४ ‘अॅप्स’वर बंदी घातली आहे.
India bans 54 more #Chinese apps for security reasons! Viva Video, AppLock face axe – Check full list here…👇
#ChineseApps #DigitalStrikehttps://t.co/mBuSpoHaA1
— Zee Business (@ZeeBusiness) February 14, 2022