‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव पालटून ‘वोडेयार एक्स्प्रेस’ करा ! – म्हैसूरतील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

मुळात अशी मागणी करू लागू नये. रेल्वे प्रशासनाने स्वतःहून हा पालट केला पाहिजे !

आक्रमकांच्या स्मृती पुसण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे जपणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक

म्हैसुरू (कर्नाटक) – येथील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांनी ‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव बदलून ‘वोडियार एक्स्प्रेस’ करण्याची मागणी करणारे पत्र रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांना लिहिले आहे. सिम्हा यांनी पत्रात कुठेही टिपूचे नाव घेतले नसून केवळ रेल्वेगाडीचा क्रमांक नमूद केला आहे. सिम्हा यांनी पत्रात म्हटले आहे की, म्हैसुरू संस्थानच्या वोडियार महाराजांचे रेल्वेच्या विकासात मोठे योगदान मोठे आहे. त्याच्या (टिपू सुलतानच्या) काळात राज्याच्या विकासात त्याने दिलेल्या योगदानाविषयी कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.