वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणाचा निर्णय वर्ष २०२२ मध्ये येणे हा न्याय नव्हे, तर अन्याय आहे !
‘कर्णावती (गुजरात) येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने ७७ पैकी ४९ जणांना दोषी ठरवले आहे, तर २८ जणांची निर्दोष सुटका केली आहे. शहरातील २० ठिकाणी झालेल्या २१ बाँबस्फोटांच्या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४६ जण गंभीररित्या घायाळ झाले होते.’