ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये वसंतपंचमीच्या दिवशी करण्यात आले विद्यार्थ्यांचे प्रबोधन !
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे वसंतपंचमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या वतीने सौ. वैदेही पेठकर यांनी वसंतपंचमी, सरस्वतीदेवीची उत्पत्ती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली, तसेच आपल्या सर्वांगीण उत्कर्षासाठी कुलदेवीच्या नामस्मरणाचे काय महत्त्व आहे ? यासंबंधीही विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी श्री समर्थ कोचिंगचे संचालक श्री. संतोष चालीसगावकर आणि माधव महाविद्यालयाचे श्री. नितीन देवकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी लाभ घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण
या वेळी सर्व विद्यार्थ्यांना सौ. पेठकर यांनी श्री सरस्वतीदेवीला प्रार्थना करण्यास सांगितले. त्या वेळी ६-७ विद्यार्थ्यांना प्रार्थना करतांना ‘श्री सरस्वतीदेवी प्रत्यक्ष समोर उभी आहे, ती आपल्याकडे येत आहे’, असे जाणवले. याचसमवेत काही विद्यार्थ्यांना प्रार्थना केल्यानंतर सकारात्मक वाटले.