(म्हणे) ‘बुरखाबंदी प्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाला समज द्या !’ – आमदार रईस शेख
|
मुंबई – एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठाशी संलग्न असलेल्या एम्.पी. शहा महाविद्यालयाच्या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला समज देण्याची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Due to the current incident in Karnataka, MMP Shah Women's college, Mumbai has banned wearing #Hijab! Hence, have written a letter to Maha HM @Dwalsepatil ji to send instructions to educational institutions regarding this matter to avoid any serious repercussions. #HijabRow pic.twitter.com/IR5854Jl8F
— Rais Shaikh (@rais_shk) February 10, 2022
शेख यांनी या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये इतर शिक्षण संस्थांमध्येही हिजाब घालण्यास बंदी असू शकते. त्यामुळे ही गोष्ट भेदभावजनक असून धार्मिक तणाव, संघर्ष वाढवणारी आहे. प्रत्येकाला भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क प्रदान केले असून वेश परिधान करण्याचा हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांना वेश परिधान करण्याविषयी कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थिनींच्या धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत, अशी विशेष सूचना देण्यात यावी, असे शेख यांनी पत्रात म्हटले आहे. (भारतीय राज्यघटनेत ‘समानता’ हेही सूत्र आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी समान गणवेश असणे आवश्यक नाही का ? – संपादक)