श्रीलंकेतील नौदलाकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक
रामेश्वरम् – तमिळनाडूतील धनुष्यकोडी-थलाईमन्नार परिसरातील समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या भारताच्या १२ मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. त्यांना श्रीलंकेच्या स्थानिक न्यायालयात उपस्थित करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या १२ मासेमारांकडून २ नौका कह्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर श्रीलंकेच्या समुद्री भागात अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Sri Lankan Navy Arrests 12 Indian Fishermen – श्रीलंकाई नौसेना ने 12 भारतीय मछुआरों को गिरफ्तार किया https://t.co/hVc4X6szky
— राष्ट्र-भक्त (@h1Ltw4DYjK5mYAI) February 13, 2022
(श्रीलंकेच्या नौदलाने सांगितलेले हे कारण योग्य आहे कि ‘श्रीलंका भारतावर कुरघोडी करण्यासाठी भारतीय मासेमारांना अटक करत आहे’, हे भारतीय जनतेला समजायला हवे ! – संपादक)