५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आयुष साई दीपक हा एक आहे !
माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४.२.२०२२) या दिवशी त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. आयुष साईदीपक याला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
‘वर्ष २०१५ मध्ये कु. आयुष साईदीपक हा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५४ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. ‘कु. आयुष याची बुद्धी तीक्ष्ण असून त्याची आकलनक्षमताही चांगली आहे. त्याला तांत्रिक कामातही पुष्कळ रस आहे.
२. त्याच्यात उत्तम नियोजनकौशल्य आणि नेतृत्व हे गुण आहेत.
३. नामजप करण्याची आणि सत्संग ऐकण्याची आवड
अ. १.१.२०२१ या दिवशी आमच्या संकुलात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केले होते. आयुषला तिथे जाण्यात काही स्वारस्य नव्हते. तो म्हणाला, ‘‘पुढच्या वर्षी १ जानेवारीला आपण आपल्या घरी सामूहिक नामजप ठेवूया.’’
आ. एकदा आयुषच्या आईने (सौ. अंजना साईदीपक यांनी) त्याला विचारले, ‘‘तुझा आतून नामजप चालू असतो का ?’, हे पहा.’’ तेव्हा त्याने स्वतःचे निरीक्षण करून दुसर्या दिवशी आईला सांगितले, ‘‘माझा जप आतून चालू असतो आणि मला तो दोनदा ऐकूही आला.’’
इ. त्याला सद्गुरु सिरियाक वाले घेत असलेले ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकायला पुष्कळ आवडतात. तो रात्री १० – ११ वाजता असलेले सत्संगही आवडीने ऐकतो. तो त्यावर आम्हाला प्रश्नही विचारतो.
४. त्याला मातृभाषेचा फार अभिमान आहे. ‘बोलतांना इंग्रजी शब्द वापरू नयेत’, असा त्याचा आग्रह असतो.
५. धर्माभिमान
अ. एकदा आयुषच्या चुलत भावाचा वाढदिवस होता. तेव्हा तेथे आलेल्या सर्वांनी केक कापून ‘हॅपी बर्थडे’ हे गाणे म्हटले. तेथून घरी आल्यावर आयुषने आम्हाला सांगितले, ‘‘मी ते गाणे म्हटले नाही; कारण हिंदु धर्मात तसे करत नाहीत.’’
आ. आयुषच्या शाळेतील शिक्षकांनी ‘दिवाळीच्या दिवसांत केवळ दिवे लावा. उगाच पैसे व्यय करू नका’, असे सांगितले; मात्र त्यांनी नाताळच्या वेळी मुलांना ‘क्राफ्ट पेपर’ आणून शुभेच्छापत्रे बनवा’, असे सांगितले. तेव्हा आयुषला प्रश्न पडला, ‘शिक्षकांनी ‘दिवाळीला पैसे व्यय करू नका’, असे सांगितले; पण ‘नाताळला बाहेर जाऊन खरेदी करा’, असे सांगितले. हा विरोधाभास का ?’ तो या संदर्भात जागरूक असतो. त्याला हिंदु धर्माविषयी पुष्कळ अभिमान वाटतो.
इ. शाळेत नाताळच्या वेळी मुलांसाठी ‘ऑनलाईन पार्टी’ ठेवली होती. तेव्हा सर्वांनी ‘जिंगल बेल (Jingle bell)’ इत्यादी गाणी म्हणायची’, असे शिक्षकांनी सांगितले होते. एरव्ही आयुषचा शाळेतील सर्व गोष्टींत सहभाग असतो; पण या वेळी तो शांत होता. त्याच्या शिक्षिकेच्या हे लक्षात आले. शिक्षिकेने त्याला याविषयी विचारल्यावर तो काही बोलला नाही; पण तो आम्हाला म्हणाला, ‘‘तुम्ही मला हिंदु शाळेत घातले; परंतु तिथे नाताळ साजरा करतात. मग दिवाळी साजरी करत का नाहीत ?’’
६. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
तो नामजपादी उपाय पूर्ण करतो. तो प्रत्येक आठवड्याला त्याच्या व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग घेणार्या ताईला पाठवतो.
७. सेवेची आवड
तो आम्हाला ‘सोशल मिडिया’ची सेवा करायला साहाय्य करतो. तो आम्हाला ही सेवा सोप्या प्रकारे आणि गतीने करायचे मार्गही सुचवतो. तो म्हणतो, ‘‘समष्टी सेवा करून माझी लवकर प्रगती होईल.’’
८. अनुभूती
वर्ष २०२० च्या दिवाळीच्या दिवशी आयुषला घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते. तेव्हा त्याला पुष्कळ चांगले वाटले.’
– श्री. साईदीपक गोपीनाथ (वडील), त्रिवेंद्रम्, केरळ. (२१.१.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |