उडुपी येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या

कर्नाटकातील हिजाबचा वाद

उडुपी (कर्नाटक) – येथील हिजाबच्या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर येथील भाजपचे आमदार रघुपती भट यांना ठार मारण्याच्या धमक्या दूरभाषद्वारे येत आहेत. रघुपती भट उडुपी येथील ‘प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर वुमन’च्या विकास समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना आलेले दूरभाष हे विदेशातून इंटरनेटद्वारे आल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘हिजाबच्या सूत्रावर जर मी ठोस भूमिका घेतली, तर तुम्हाला लक्ष्य केले जाईल’, अशा धमक्या त्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांना माहिती दिली आहे.

हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो ! – रघुपती भट

कर्नाटकातील हिजाबचा वाद निर्माण करण्यामागे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. या प्रकरणाचे अन्वेषण राज्यातील पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहेत; मात्र याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) केले गेले पाहिजे, अशीही मागणी आमदार रघुपती भट यांनी केली आहे.