हिजाबवरून भारतात सार्वमत घेण्यासाठी पाककडून ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा वापर
हिजाबच्या सूत्रावरून भारतात अराजकता पसरवण्याचा पाकचा कट
|
नवी देहली – देशात सध्या हिजाबवरून वाद चालू असतांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून भारतात अराजकता पसरवण्याचा कट रचला आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने याविषयी व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर विभागाने सतर्क रहाण्यास सांगितले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ने या व्हिडिओमध्ये पन्नू याने भारतीय मुसलमानांना हिजाबसाठी सार्वमत घेण्यासाठी आणि भारताला ‘उर्दुस्तान’ बनवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी एक संकेतस्थळ बनवण्यात आले आहे.
हिजाब विवाद की आड़ में ISI रच रही साजिश, पन्नू को बनाया मोहरा https://t.co/LLvLZNPT9j
— News Nation (@NewsNationTV) February 12, 2022