१० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० गोव्यातील उमेदवार
‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ६ होती. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले हे सर्व उमेदवार विजयी झाले होते.’