विक्रोळी (मुंबई) येथे योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन महोत्सव’ साजरा करण्यात येणार !
मुंबई – ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे युवा पिढीमध्ये स्वैराचार आणि चंगळवाद वाढत आहे. पाश्चात्त्यांच्या या अंधानुकरणाऐवजी युवा पिढीमध्ये स्वत:च्या आई-वडिलांविषयी आदरभाव वृद्धींगत व्हावा, यासाठी योग वेदांत सेवा समितीच्या वतीने प्रतिवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यात येतो. विक्रोळी (पूर्व), कन्नमवारनगर येथील संभाजी गोल मैदानावर समितीच्या वतीने अशाच प्रकारे ‘मातृ-पितृ पूजन महोत्सव’ साजरा केला जाणार आहे. दुपारी ४ वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. याविषयी अधिक माहिती ८२८६०३९७९७ या भ्रमणभाष क्रमांकावर प्राप्त होईल.
संस्कृतीप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन योग वेदांत सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.