(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते भारतावर राज्य करू शकतात !’ – एम्.आय.एम्.चे नेते गुफरान नूर

धर्मांधांची राष्ट्र आणि धर्म विघातक वृत्ती दर्शवणारी घटना

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची विधाने करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
  • कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात येते, तर अशा धर्मांध नेत्यांवर कारवाई का होत नाही ?  
  • दिवास्वप्ने पहाणारे धर्मांध ! हिंदू संघटित नसल्यानेच आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध अशा प्रकारची विधाने करण्यास धजावत आहेत, हे लक्षात घ्या !
(डावीकडून) गुफरान नूर, असदुद्दीन ओवैसी

‘हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत एका विशिष्ट धर्माला तोडण्याचे आवाहन करण्यात आले. हा धर्म कोणता होता ? हा इस्लाम धर्म होता. हिंदुत्वाची शाल पांघरून काही आतंकवादी गट मुसलमानांना तोडण्याची भाषा करत होते. आमच्या इस्लाममध्ये स्वतःला आणि दुसर्‍याला मारण्याची अनुमती नाही; मात्र जेव्हा आक्रमणकारी अत्याचाराची परिसीमा गाठतो, तेव्हा त्याला मारण्याची अनुमती आहे. जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतावर राज्य करू शकतात’, अशी चेतावणी एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी अलीगड (उत्तरप्रदेश) येथील जमालपूर येथे दिले. ते येथे एका कोपरा सभेमध्ये बोलत होते.