अलीगड मुस्लिम विद्यापिठात हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने !

ज्यांना गणवेशाऐवजी हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये यायचे असेल, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जावे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?

नवी देहली – कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातील हिजाबच्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. अलीगड मुस्लिम विद्यापिठामधील विद्यार्थ्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने केली. ‘हिजाब हा मुसलमान महिलांचा हक्क असून तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही’, असे निदर्शकांकडून सांगण्यात येत होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१. राजस्थानच्या जयपूरमधील चाकसू येथे कस्तुरीदेवी महाविद्यालयात काही विद्यार्थिनी हिजाब आणि बुरखा घालून पोचल्या. त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. त्यांना गणवेश घालून येण्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे वाद झाला. त्या वेळी मुलींनी पालकांना बोलावून घेतले. त्यानंतरही मुलींना प्रवेश दिला गेला नाही. याची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला.

२. जम्मूमध्ये आर्.एफ्.ए.-डोगरा फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी हिजाबच्या विरोधात निदर्शने केली. ‘शैक्षणिक संस्थांना राजकीय आखडा बनवला जाऊ नये. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब किंवा भगवे उपरणे, यांपैकी कशालाच अनुमती देऊ नये, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.