कर्नाटकात येणार्यांसाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ अहवालाची सक्ती रहित !
बेळगाव – महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्यांसाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ (कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र) अहवालाची सक्ती रहित करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी.ए. अनिलकुमार यांनी ही घोषणा केली. असे असले तरी कर्नाटक राज्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा म्हणजेच लसीकरण पूर्ण झाल्याची कागदपत्रे पडताळणी नाक्यावर दाखवावी लागणार आहेत.
यापूर्वी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रवेश करणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्. निगेटिव्ह’ अहवाल असल्याविना प्रवेश दिला जात नव्हता. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्यांची प्रचंड गैरसोय होत होती. याचा परिणाम आंतरराज्य वाहतुकीवर झाला होता. या निर्णयामुळे विशेषकरून कोल्हापूर, सांगली भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.