मतदारांनो हे लक्षात घ्या !
‘भारतियांनो, गेल्या ७४ वर्षांचा भारताचा इतिहास बघता, यापुढेही राज्यकर्ता म्हणून कोणताही राजकीय पक्ष निवडून आला, तरी ‘तो देशासाठी काही करील’, अशी खोटी अपेक्षा करू नका !’
‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’
‘राजकारणी लोकांना मायेत अडकवतात, तर साधक स्वतः मायेतून मुक्त होतात आणि इतरांनाही ‘मायेपासून मुक्त कसे व्हायचे’, ते शिकवतात.’
‘बहुतेक मतदारांना अध्यात्मातील सूक्ष्मातील काही कळत नाही. ही निवडणुकीतील उमेदवारांसाठी भाग्याची गोष्ट आहे; कारण बहुतेक उमेदवारांची छायाचित्रे त्यांच्यातील नकारात्मकता दर्शवतात. त्यामुळे सूक्ष्मातील कळणार्या मतदारांना ‘त्यांना मत देऊ नये’, असे वाटणे स्वाभाविकच असेल. त्यामुळे ते उमेदवार निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हरतील !’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती