इस्लाममध्ये कुठेही महिलांसाठी हिजाबचा उल्लेख नाही ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचे सुतोवाच
नवी देहली – इस्लाममध्ये हिजाब नाही. इस्लाममध्ये कुठेही महिलांच्या वेशभूषेच्या संदर्भात ‘हिजाब’ शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. इस्लामचे ५ प्रमुख स्तंभ सांगितलेले आहेत, त्यात हिजाबचा उल्लेख नाही, असा दावा केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
Kerala Governor Arif Mohammad Khan on Karnataka #HijabRow: Hijab is not part of Islam. This word has been mentioned 7 times in the Quran, but not in the context of the dress code. The controversy around hijab is part of a conspiracy to hamper the education of Muslim women.
(ANI) pic.twitter.com/KuUd7UNHOU— Argus News (@ArgusNews_in) February 12, 2022
राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी मांडलेली सूत्रे
१. जर आपणे हे मान्य जरी केले की, मुसलमान असल्याने हिजाब आवश्यक आहे, तरी त्याचा तोटा कुणाला होणार आहे ? आज मुसलमान महिला भारतीय पोलीस सेवेमध्ये अधिकारी होत आहेत, वायूदलामध्ये भरती होत आहेत, अशा वेळी त्या हिजाब घालून कामे करू शकणार आहेत का ?
Arif Mohammad Khan @KeralaGovernor in an exclusive conversation with @maryashakil says, ‘First you have to make proper diagnosis, how this problem started, who are behind this. Muslims were first in India to introduce in Western Education, by Sir Sayed Ahmad. pic.twitter.com/cPH1BqEMPu
— News18 (@CNNnews18) February 12, 2022
२. हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत. त्यांची इच्छा आहे की, मुसलमान महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जावे.
३. स्वातंत्र्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसारख्या संस्था आधी इंग्रजी शिक्षणाच्या विरोधात होत्या, मुसलमान महिलांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शक्ती पणाला लावली होती; मात्र गेल्या १५ ते २० वर्षांत त्यांच्या गोष्टी कुणीच ऐकण्यास सिद्ध नाही.