ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ हे पुढील अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त आहेत. ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ म्हणून राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये या पश्चिम महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून साधना कशी होईल ? या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. या वेळी सर्वच स्तरांतून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मागील लेखात आपण सोलापूर येथील साधकांचे अनुभव आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग पाहिला. या लेखात सनातन ग्रंथसंपदेविषयी विविध मान्यवरांनी दिलेले अभिप्राय आणि अभियानाला प्रसिद्धी माध्यमांचा सक्रीय सहभाग आणि प्रतिसाद पाहूया. तसेच आसाम येथे मिळालेला प्रतिसादही पाहूया.

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सनातन ग्रंथसंपदेविषयी महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ पुढील पिढीस उपयुक्त ! – श्री. मोहनराव दाते (दाते पंचांगकर्ते), सोलापूर

‘सध्याच्या काळात सनातन संस्था हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी कार्यरत आहे. सनातन संस्थेने आचारधर्म, प्रथमोपचार, देवता, आहार, धर्मशिक्षण यांसारख्या विविध विषयांवर प्रकाशित केलेले ग्रंथ पुढील पिढीला उपयुक्त आहेत. या पिढीला संस्कारांची ओळख झाली, तर भारतीय संस्कृती टिकणार आहे. ही संस्कृती टिकवण्याचे काम सनातन संस्था नेटाने करत आहे. विविध भाषांमध्ये उपलब्ध असणार्‍या सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेचा आवर्जून अभ्यास करा.’

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

प्रत्येकाने सनातन संस्थेच्या ग्रंथांचा अभ्यास करावा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदु धर्माचे महत्त्व सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. ‘आपली दिनचर्या कशी असावी ? धर्म म्हणजे काय ? आपली वेशभूषा आणि केशभूषा कशी असावी ?’, अशा अनेक विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास प्रत्येकाने करावा, तसेच हे ग्रंथ संग्रहीही ठेवावेत.’

सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असणे आवश्यक ! – पू. कौस्तुभबुवा रामदासी, मठाधिपती, वेणास्वामी मठ, मिरज

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशनाचे मोठे कार्य संस्थेने हाती घेतलेले आहे. आतापर्यंत संस्थेने ३५० ग्रंथांचे प्रकाशन केलेले आहे. या ग्रंथसंपदेमध्ये धर्मकर्तव्य, राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार अशा विविध विषयांवर ग्रंथ आहेत. पुढील पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी भारतीय परंपरा, हिंदु परंपरा, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्तम सुसंस्कारित पिढी निर्माण होईल. या ग्रंथांचे वाचन अधिकाधिक लोकांनी करावे.’

सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करून धर्माचरण करूया ! – पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

‘सनातन संस्था देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपण प्रयत्न करूया. ग्रंथांच्या आधारे धर्माचरण करून धर्माचे पालन करूया.’

गीतेमध्ये स्वधर्माचे महत्त्व श्रीकृष्णाने सांगितले असून तेच कार्य सनातनचे ग्रंथ करत आहेत ! – ह.भ.प. (सौ.) संध्या पाठक, कीर्तनकार, सांगली

‘जीवनाचे खर्‍या अर्थाने सोने करता यावे, यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. गीतेमध्ये स्वधर्माचे महत्त्व श्रीकृष्णाने सांगितले असून तेच कार्य सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून करत आहेत. ‘आपत्काळाला सामोरे कसे जायचे ? स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र आणि धर्माचरण कसे करावे ?’, यांसारख्या प्रत्येक कृतीविषयी सखोल ज्ञान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोप्या भाषेमध्ये मांडले आहे. मी आणि माझे कुटुंब या ग्रंथांचा अभ्यास नियमित करत असून त्याप्रमाणे आचरणही करत आहोत.’

– सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

आसाम

आसाम येथील अधिवक्ता राजीव नाथ यांनी त्यांच्या संघटनेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या अभियानासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथांची मागणी देणे

अधिवक्ता राजीव नाथ

‘आसाम येथील अधिवक्ता राजीव नाथ हे हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आहेत. ते ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात कार्य करतात. आम्ही त्यांना संपर्क करून ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ या विषयावर बंगाली अन् आसामी भाषेत ग्रंथ उपलब्ध असल्याचे सांगितले. दोन दिवसांनी त्यांनी आम्हाला संपर्क करून ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथांची मागणी दिली. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘तुमचा भ्रमणभाष आला असतांना आमच्या संघटनेची बैठक चालू होती. त्यात आम्ही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान करण्याचे नियोजन करत होतो. त्याच वेळी तुमचा मला भ्रमणभाष आला आणि आम्हाला आमच्या अभियानासाठीचे ग्रंथ मिळाले.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझ्या लक्षात आले, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान गुरुदेवांचेच नियोजन आहे.’

– एक साधक (३०.१.२०२२)

अभियानाला विविध वृत्तपत्रे, वृत्तसंकेतस्थळे (न्यूज पोर्टल), वृत्तवाहिन्या यांचा सक्रीय सहभाग आणि प्रतिसाद !

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत सनातन संस्थेच्या वतीने विविध वृत्तपत्रे, वृत्तसंकेतस्थळे (न्यूज पोर्टल), वृत्तवाहिन्या यांना ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन, नामजप कसा करावा ?’, अशा ग्रंथांविषयीचे लेख आणि तसेच अभियानांतर्गत प्रसिद्धीपत्रक देण्यात आले होते. त्यानुसार पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील अनेक वृत्तपत्रे आणि ‘न्यूज पोर्टल’ यांनी लेख अन् प्रसिद्धीपत्रक यांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने सक्रीय प्रतिसाद दिला आणि अभियानात एक प्रकारे सहभागी झाले. यामुळे अभियानाचा विषय लाखो लोकांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.

१. सातारा येथील ‘दैनिक कर्मयोगी’ या स्थानिक वृत्तपत्राने ग्रंथांविषयीचा लेख प्रसिद्ध केला, तसेच ‘नवरात्र – देवीचे व्रत’ या विषयावरील लेखाला ३ दैनिकांत प्रसिद्धी मिळाली.

२. सोलापूर येथील ‘लाईव्ह सोलापूर’ ‘यू ट्यूब चॅनल’चे संपादक श्री. विजयकुमार बाबर यांनी कुलदेवीचा नामजप करण्यास आरंभ करणे आणि साधकांच्या समवेत प्रार्थना करणे : समितीच्या कार्यकर्त्यांची ‘नवरात्रीचे महत्त्व’, ‘नवरात्रातील विविध उपचारांमागील अध्यात्मशास्त्र’, ‘विजयादशमी’ आणि ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत सनातन संस्थेच्या ग्रंथांचे महत्त्व’, अशा ४ विषयांच्या बाईटचे (लहान मुलाखत किंवा एका व्यक्तीने दिलेली माहिती) स्वतःहून चित्रीकरण केले आणि त्वरित पहिला ‘व्हिडिओ’ त्यांनी ‘यू ट्यूब’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबूक’ आणि ‘डेलीहंट’ अशा ४ सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केले. श्री. बाबर यांनी साधना जाणून घेऊन कुलदेवीचा नामजप करण्यास आरंभ केला. ते चित्रीकरणापूर्वी आणि चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर साधकांच्या समवेत प्रार्थना करत होते.

३. सांगली येथील ‘सी’ केबल न्यूजवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांची बाईट (लहान मुलाखत) प्रसारित करण्यात आली. त्यामुळे सहस्रो लोकांपर्यंत विषय पोचणे शक्य झाले.

४. पुणे येथे एका वृत्त संकेतस्थळाने (‘न्यूज पोर्टल’ने) अभियानाच्या संदर्भातील प्रतिदिन १ लेख प्रसिद्ध केला आहे. त्यांनी ‘यापुढेही प्रसिद्धी देऊ’, असे सांगितले. त्यांची दर्शक संख्या २ लाख आहे.’

– सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२४.१०.२०२१)