हिजाबविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यामुळे हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांधाकडून आक्रमण
हिंदु तरुण आणि त्याच्या वृद्ध आईला मारहाण
|
दागणगेरे (कर्नाटक) – येथील नल्लूर गावात रहाणार्या नवीन या २५ वर्षीय तरुणाने हिजाबच्या संदर्भात सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केल्यामुळे धर्मांधांनी त्याच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. यासह त्याला आणि त्याच्या ६० वर्षीय आईला मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. मारहाणीत घायाळ झाल्याने नवीन आणि त्याच्या आईला शिवमोग्गा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येथील स्थानिक आमदार आणि पोलीस यांनी गावात जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. (असे आवाहन करण्याऐवजी आक्रमण करणार्या धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे ! – संपादक)