आधुनिक वैद्यांना अर्थात् डॉक्टरांना आता महर्षि चरक यांची शपथ घ्यावी लागणार !
नवी देहली – भारतात आता डॉक्टर त्यांच्या सेवेविषयी शपथ घेतांना महर्षि चरक यांची शपथ घेणार आहेत. येत्या १४ फेब्रुवारीपासून हा नियम लागू होणार आहे.
महर्षि चरक की परंपरा में चिकित्सा एक व्यवसाय नही अपितु मानवसेवा का माध्यम है।
एम्स के पूर्व निदेशक का अभिनंदन। pic.twitter.com/1do7jp0nMT— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) February 12, 2022
१. वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना ‘हिप्पोक्रेटिक’ शपथ घ्यावी लागते. ‘हिप्पोक्रेटस’ हा ग्रीक डॉक्टर होता. त्याचा कार्यकाळ इसवी सन पूर्व ४६० ते ३७५ असा मानला जातो. त्यापूर्वी ‘आजारपण हे देवाच्या अवकृपेमुळे येते’, असे मानले जात होते; मात्र हिप्पोक्रेटसने हे खोडून काढत ‘आजारपण हे नैसर्गिक कारणांमुळे येते’, असा सिद्धांत मांडला. तेव्हापासून त्याला औषधशास्त्राचा जनक मानले जाते. त्याच्या नावे घेण्यात येणार्या या शपथेनुसार, ‘वैद्यक विद्या ही अतिशय प्रतिष्ठेची असून तिचा वापर विवेकाने करीन. रुग्णाचे आरोग्य हेच माझ्यासाठी प्राधान्य असून त्याच्याविषयी गोपनीयता राखणे, हे माझे कर्तव्य आहे’, अशी शपथ घेण्यात येते. डॉक्टरचा पांढरा कोट परिधान करण्यापूर्वी प्रत्येकाला ही शपथ घ्यावी लागते.
२. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशनने) ही शपथ रहित करून त्याऐवजी भारतीय वैद्यकशास्त्रातील महर्षि चरक यांची शपथ घ्यावी, असा प्रस्ताव ७ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत संमत केला आहे. ही शपथ प्रादेशिक भाषांमध्ये घेता येण्याची मुभा देण्यात आली आहे.
३. या शपथेसमवेतच एम्.बी.बी.एस्.च्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना १० दिवसांच्या योगशिबिराला पाठवण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश संबंधित सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
४. महर्षि चरक यांच्या शपथेमध्ये, ‘रुग्णाला झालेल्या आजाराचे सुयोग्य निदान करून त्यावर योग्य असे उपचार होतील, हे प्राधान्याने पाहीन, तसेच रुग्णाच्या खासगीपणाचा आदर करून त्याच्या आजाराविषयी गोपनीयता राखेन’ असे म्हटले आहे.
(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या इच्छेनुसार वैद्यकीय शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न !’ – काँग्रेस
जळी, स्थळी भगवाच दिसणार्या काँग्रेसला कधी भारतीय अस्मिता आणि परंपरा यांचा आदर करावा, असे का वाटत नाही ? महर्षि चरक यांच्याविषयी काँग्रेसला द्वेष का ? – संपादक
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ‘हिप्पोक्रेटिक’ शपथेच्या जागी ‘चरक शपथ’ घेण्याचा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा प्रस्ताव हा संघाच्या इच्छेनुसार वैद्यकीय शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न आहे. हिप्पोक्रॅटिक शपथ जी सार्वत्रिक नैतिकता आणि मूल्ये यांचे प्रतिनिधीत्व करत,े ती पालटली जाऊ शकत नाही, असे ट्वीट काँग्रेसच्या केरळ शाखाकडून करण्यात आले आहे.
(म्हणे) ‘हिप्पोक्रेटिक’ पालटण्याऐवजी चरक शपथही लागू करा !’ – काँग्रेसचे खासदार शशी थरूर
पाश्चात्त्यांना कवटाळून बसण्याची काँग्रेसची जुनी खोड आहे. अशा काँग्रेसचे भारतात काय काम ? तिने पाश्चात्त्य राष्ट्रांत चालते व्हावे ! – संपादक
अनेक डॉक्टर चिंता व्यक्त करत आहेत. मी सर्व भारतीय शिक्षणामध्ये भारतीय घटकांचा परिचय करून देण्याच्या बाजूने आहे; परंतु सार्वत्रिक मूल्ये आणि मानक यांना डावलून नाही. जगभरातील डॉक्टरांनी घेतलेल्या ‘हिप्पोक्रेटिक’ शपथेला पालटण्याऐवजी चरक शपथही लागू का करू शकत नाही ?, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्वीट करून केला आहे.