युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. रशिया आणि ‘नाटो’ सैन्यांमधील तणाव वाढला आहे. (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजे नाटो. ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.) त्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांनी हे विधान केले आहे. बायडेन यांनी अमेरिकी नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या प्रश्‍नावर बायडेन म्हणाले की, तेथे सैन्य पाठवणे म्हणजे महायुद्धाचा प्रारंभ होय.