हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्यूब यांची १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) गोठवली !
नवी देहली – अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकाच्या पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कारवाई करून १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी राणा अय्यूब यांच्याविरुद्ध सप्टेंबर २०२१ मध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. साहाय्यता निधीच्या स्वरूपात गोळा झालेली रक्कम त्यांनी स्वत:साठी वापरल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. या अनुषंगाने ‘ईडी‘ने अन्वेषण केल्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून ही कारवाई केली.
The Enforcement Directorate (#ED) attached Rs 1.77 crore belonging to journalist Rana Ayyub in a #moneylaundering case
(@MunishPandeyy) https://t.co/urC3JKiyXS— IndiaToday (@IndiaToday) February 11, 2022