उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांचा राजीनामा !
लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत वादग्रस्त निर्णय दिले होते
नागपूर – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती गनेडीवाला यांचा कार्यकाळ संपणार होता; मात्र त्यापूर्वीच त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. लैंगिक शोषणाच्या ‘स्कीन टू स्कीन टच’ याविषयी वादग्रस्त निर्णय न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेला निर्णय रहित केला होता, तसेच अन्य एका प्रकरणातही निकाल वादग्रस्त होता. न्या. पुष्पा गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी कायम करण्याची शिफारस मागे घेण्यात आली होती.
Bombay HC च्या न्यायाधीशांचा राजीनामा, पुष्पा गनेडीवाला यांनी का उचललं असं पाऊल#BombayHighCourt#JusticePushpaGanediwalahttps://t.co/ZnKOURGI4P
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) February 12, 2022
एका प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या अंगावर कपडे असतांना तिच्या छातीवरून केलेला स्पर्श लैंगिक अत्याचार नसल्याचा निर्णय त्यांनी दिला होता. दुसर्या प्रकरणात एखाद्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर विजारीची झिप उघडणे पॉक्सो कायद्यांतर्गत यौन शोषण नाही, तर भा.दं.वि. कलम ३५४ अ अंतर्गत लैंगिक छळ आहे, असे त्यांनी म्हटले होते.