‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एक प्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? गोव्यात ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद
‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या ३०१ पैकी ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत; मात्र ही संख्या वर्ष २०१७ मध्ये ३ होती. मागील ५ वर्षांत गंभीर गुन्हे प्रविष्ट असलेल्या उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे.’