श्रीमती शशिकला भगत यांना देवद आश्रमातील ध्यानमंदिराविषयी जाणवलेली सूत्रे
१. ध्यानमंदिराच्या आठवणीने मनाला आनंद होऊन ‘ध्यानमंदिरातील देवता बोलावत आहेत’, असे जाणवणे
‘मला आश्रमातील ध्यानमंदिराच्या आठवणीने आनंद होतो. नवीन ध्यानमंदिराच्या मार्गिकेतून ध्यानमंदिरात जातांना ‘एक पांढर्या प्रकाशमान पोकळीतून, चैतन्याच्या लहरीतून जात आहे आणि ध्यानमंदिरात असलेल्या देवता बोलावत आहेत’, असे मला जाणवते अन् मी तिकडे ओढली जाते.
२. ध्यानमंदिरात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. ध्यानमंदिर एका ध्यानस्थ ऋषीप्रमाणे शांत आणि स्थिर जाणवते.
आ. कालचक्र थांबल्याप्रमाणे जणू ‘जग तेथे येऊन थांबले आहे’, असे मला वाटते. ‘शब्दांत वर्णन करता येणार नाही’, अशी शांतता येथे लाभते.
इ. ‘ध्यानमंदिरातील अष्टदेवतांच्या चित्रांतील देवतांच्या चैतन्यात वृद्धी झाली आहे’, असे मला जाणवते.
ई. ‘प्रत्येक देवतेचे चित्र प्रकाशमान आणि जागृत झाले आहे. ‘मी केलेली याचना प्रत्येक देवता ऐकत आहे. ती माझ्या अडचणी सोडवून मला विहंगम साधनेचा मार्ग दाखवत आहे’, असे मला वाटते.
उ. ध्यानमंदिरात एक विलक्षण पोकळी निर्माण झाली असून त्यात एक नाद निर्माण झाला आहे आणि हा नाद मनाला आनंद देणारा आहे.
ऊ. आरतीच्या वेळी वाजवलेला शंख आणि झांज यांचा नाद अन् आरतीच्या स्वरांचाही नाद या पोकळीत घुमतो.
– श्रीमती शशिकला भगत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.१०.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |