विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानला सांगली जिल्हा नगरवाचनालयाचा ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार घोषित !
सांगली, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके यांच्या आर्थिक सहयोगातून देण्यात येणारा ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार यंदाच्या वर्षी बामणोली (कुपवाड) येथील विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान यांना घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार १७ फेब्रुवारी या दिवशी सांगली जिल्हा नगर वाचनालय येथे सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह श्री. सुहास करंदीकर, सहकार्यवाह श्री. विकास जोशी, अध्यक्ष श्री. श्रीकांत जोशी, तसेच श्री. शरद फडके यांनी केले आहे.