देवद येथील सनातनच्या आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार रहात असलेल्या खोलीत येऊन फुलपाखराने प्राण सोडणे

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. खोलीच्या बाहेरील भिंतीवर फुलपाखरू रात्रभर बसणे आणि सकाळी त्याला पाहून ‘ते मुक्ती मिळावी, यासाठी आले आहे का’, असे वाटणे

‘६.७.२०२० या दिवशी रात्री १२ वाजता आमच्या खोलीच्या बाहेरील भिंतीवर एक फुलपाखरू येऊन बसले. (परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी देवद आश्रमात आल्यावर या खोलीत रहात असत. सध्या त्या खोलीत पू. (सौ.) अश्विनी पवार, कु. स्नेहा झरकर आणि कु. पूजा जठार रहातात.) त्या वेळी त्याच्याकडे पाहिल्यावर ‘ते शरणागतभावाने बसले आहे’, असे आम्हाला जाणवले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी त्या फुलपाखराकडे पाहिल्यावर ‘त्याला या जन्मातून मुक्ती मिळावी; म्हणून ते इथे आले आहे का ?’, असे आम्हाला वाटले.

सौ. स्नेहा हाके

२. दुपारी फुलपाखरू खोलीत येणे, त्यानंतर दरवाजा उघडा असूनही ते खोलीतील भिंतीवरच बसणे आणि रात्री त्याने प्राण सोडणे

दुपारी ४.४५ वाजता खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर ते फुलपाखरू खोलीच्या आत येऊन दाराच्या जवळील भिंतीवर बसले. फुलपाखरू खोलीत आल्यावर त्याला खोलीतून बाहेर जाता यावे, यासाठी आम्ही खोलीचे दार उघडे ठेवले होते. दुपारी ४.४५ वाजल्यापासून रात्री १०.१५ वाजेपर्यंत ते अजिबात हलले नाही. त्यानंतर रात्री १०.१५ ते १०.३५ च्या कालावधीत त्याने प्राण सोडले.

सौ. पूजा गरूड

३. परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील चैतन्यामुळे फुलपाखरू खोलीत येणे आणि ‘भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठीच त्याने खोलीत येऊन प्राण सोडले’, असे जाणवणे

देवद आश्रमातही परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यातील चैतन्यामुळे फुलपाखरू आले. ‘जणू काही भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी त्या फुलपाखराने खोलीत येऊन प्राण सोडले’, असे आम्हाला जाणवले.’

– कु. स्नेहा झरकर (आताच्या सौ. स्नेहा हाके, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. पूजा जठार (आताच्या सौ. पूजा गरूड), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक