‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात पोलिसांना योग्य त्या कृती करण्याच्या सूचना देऊ ! – डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी
हिंदु जनजागृती समितीचे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात अपप्रकार रोखा अभियान !
निपाणी (कर्नाटक), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भातील दिलेले निवेदन योग्य असून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात पोलिसांना योग्य त्या कृती करण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले. शिक्षणाधिकारी सौ. रेवती मठ्ठद यांनी निवेदन स्वीकारल्यावर आमच्या अखत्यारीत येणार्या शाळांमध्ये असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे सांगितले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री अमोल चंडके, राजेंद्र गुरव, सुदाम चव्हाण, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. प्रथमेश गावडे आणि श्री. संदीप जाधव उपस्थित होते. सातारा येथेही याविषयी निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा
१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांना, प्रांताधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक शिवाजी संतराम भोसले यांना, तसेच उपअधीक्षक पोलीस कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मनोज पोवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजीव भाऊसाहेब चव्हाण, सौ. रंजना पाटील, सौ. सुधा बिलावर, कु. गणेश हजारे, कु. साक्षी पाटील, श्री. उमेश विचारे, श्री. जनार्दन देसाई उपस्थित होते.
२. कोडोली येथे यशवंत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोडोली यांचे प्राचार्य श्री. आर्.आर्. पाटील यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी, ‘‘आम्ही योग्य त्या सूचना देऊ’’, असे सांगितले. याचप्रकारे कोडोली भाई शं.तू. आप्पा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांचे प्राचार्य श्री. मारुति बोरगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी, ‘‘व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती; मात्र आम्ही असे कार्यक्रम साजरे करत नाही. त्याचसमवेत समितीच्या वतीने निवेदन दिल्यामुळे आम्ही अशा प्रकारचा कोणताही ‘डे’ साजरा होऊ देणार नाही’’, असे सांगितले.
कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शितल कुमार डोईजड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘अपप्रकार रोखण्यासाठी निर्भया पथकांची नियुक्ती करू’, असे सांगितले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पन्हाळाप्रमुख श्री. सुरेश पाटील, भाजपचे श्री. महेश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी आणि श्री. गुरुदेव शेटे, तसेच सनातन संस्थेचे श्री. सुधाकर मिरजकर उपस्थित होते.
सांगली जिल्हा
पलूस – पलूस येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी निवेदन स्वीकारल्यावर ‘या संदर्भात नियोजन करून अपप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले. याच मागणीचे निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांनाही देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री शरद पाटील, विजय पाटील, गणेश बुचडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव खोत उपस्थित होते.