पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांत २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार !
|
लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांमध्ये २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार आणि ९० जणांची हत्या करण्यात आली, अशी माहिती पंजाब माहिती आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. तसेच ‘अशा घटनांत एक टक्क्याहून अल्प गुन्हेगारांना शिक्षा मिळते’, असेही यात म्हटले आहे. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार पाकमध्ये प्रतिदिन बलात्काराच्या ११ घटना घडतात.
छह महीने में ‘इज्जत’ के नाम पर 2,400 से ज्यादा महिलाओं का बलात्कारhttps://t.co/SwmyupExL9
— Zee Salaam (@zeesalaamtweet) February 8, 2022
१. गेल्या ६ मासांमध्ये पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्येच ४०० महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली, तर २ सहस्र ३०० हून अधिक महिलांचे अपहरण करण्यात आले.
२. वर्ष २०१५ ते वर्ष २०२१ या ६ वर्षांत बलात्कार आणि अपहरण यांच्या २२ सहस्र प्रकरणांची नोंद पोलिसांत करण्यात आली. या २२ सहस्र प्रकरणांपैंकी केवळ ७७ प्रकरणांत आरोपींना दोषी ठरवण्यात आले.
३. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या प्रा. निदा किरमाणी यांनी सांगितले की, पाकिस्तानात लैंगिक शोषणाच्या घटनेतील पीडितेलाच दोषी ठरवले जाते.