कोरोना संसर्गाच्या संदर्भातील निर्बंध आता अल्प केले जातील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
कोल्हापूर – सध्या देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेत अल्प होत आहे. त्यामुळे आता निर्बंध अल्प केले जातील. मुख्यमंत्र्यांनी तसा विश्वास दिला आहे. असे असले तरी महाराष्ट्र ‘मास्क’मुक्त करण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्र आणि राज्य यांच्या ‘टास्क फोर्स’शी चर्चा करून ‘मास्क’विषयी पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात पत्रकारांना दिली.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी, तर यासाठी तिजोरी रिकामी केली आहे. राज्यातील प्रत्येक कोरोना रुग्णांना प्राधान्य दिले आहे. कोरोनाकाळातील कामगिरीसाठी अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुकही केले आहे. असे असतांना पंतप्रधानांनी आमच्यावर टीका केली.’’