एस्.टी. कर्मचारी चर्चा करण्यास सिद्ध !

मुंबई – गेल्या ३ मासांपासून एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील ८ दिवसांपासून मुंबईत एस्.टी. कर्मचार्‍यांच्या बैठका चालू आहेत. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील प्रत्येक आगारातील २ एस्.टी. कर्मचारी आले होते. या बैठकीत सरकारसमवेत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कर्मचार्‍यांनी सिद्धता केली आहे. या बैठकीत कर्मचार्‍यांकडून संप मिटावा यासाठी सरकारसमोर काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार हमी सरकारने द्यावी, सर्व कर्मचार्‍यांवरील कारवाया मागे घ्याव्यात यासमवेत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रहित करण्यात यावी आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे.