शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन ७ सहस्र ९०० जणांचे गुण वाढवले !
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती
पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार विद्यार्थ्यांना नैतिकतेचे आणि मूल्यशिक्षणाचे काय धडे देणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा देणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत अनुमाने ७ सहस्र ९०० जणांनी लाखो रुपये देऊन पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे. या उमेदवारांना पात्र करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवतांना काही सांकेतिक शब्द (कोडवर्ड) दिले होते. त्यामुळे या उमेदवारांनी ओ.एम्.आर्. शीटमध्ये मार्क वाढवले असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टीईटी परीक्षेत लाखो रुपये घेऊन ७ हजार ९०० जणांचे मार्क वाढविले : अमिताभ गुप्ताhttps://t.co/9shJQhLKi7#Pune #TETExam #ExamFraud #PunePolice
— LoksattaLive (@LoksattaLive) February 9, 2022
या सर्व प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.