उडुपी (कर्नाटक) येथे हिजाबधारी धर्मांध विद्यार्थिनीकडून प्राध्यापिकेचा ‘बुल शिट’ (बैलाचे शेण) म्हणून अवमान !
|
उडुपी (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात ‘हिजाब’ घालण्यावरून विवाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. येथील म. गांधी महाविद्यालयात हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्या मुसलमान विद्यार्थिनींना ‘गोंगाट करू नका’, अशी सूचना देणार्या प्राध्यापिकेवर एका हिजाबधारी विद्यार्थिनीने ‘बुल शिट, डोंट टच मी’ (तू बैलाचे शेण आहेस. मला स्पर्श करू नकोस.), असे चिडून किंचाळल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
Burqa clad protesting ‘student’ argues with teacher at Udupi college, calls it ‘bullshit’ when asked to not disturb students studying insidehttps://t.co/3L08IeJIju
— OpIndia.com (@OpIndia_com) February 10, 2022
या प्राध्यापिकेचे नाव नयना आहे. त्या या विद्यार्थिनींना समजावून सांगण्यास गेल्या होत्या. प्राध्यापिकेच्या अवमानाचा सामाजिक माध्यमांतून तीव्र विरोध करण्यात येत आहे.