सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वसंतपंचमीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त वतीने २ फेब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्ताने एका ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सौ. मंजुळा कपूर यांनी वसंतपंचमीचे महत्त्व, श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि रथसप्तमी यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सौ. कपूर यांनी जिज्ञासूंचे शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षिता वार्ष्णेय हिने केले. या सत्संगाचा लाभ देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.