दुर्ग (छत्तीसगड) येथील बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांनी प्रशासनाला दिलेल्या चेतावणीला पर्याय नाही !
‘दुर्ग (छत्तीसगड) येथील नेहरूनगर ते पुलगावपर्यंतच्या रस्त्याचे या रुंदीकरणामध्ये येणारे एक हनुमान मंदिर हटवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाला बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांनी विरोध केला आहे. रतन यादव यांनी पत्रकार परिषदेत चेतावणी दिली की, छत्तीसगड राज्यामध्ये सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात येत आहेत. यात लव्ह जिहाद, थुंकी जिहाद, धर्मांतर आदींचा समावेश आहे. आता हनुमान मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर प्रशासन मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मंदिरासमोर असणारे चर्च हटवण्यासाठी बजरंग दलाला एक दिवसही लागणार नाही आणि याचे दायित्व प्रशासनाचेच असेल.’