हिजाबला सुशिक्षित मुसलमान महिला समर्थन करतील, तर हिंदु महिलाही हिंदुत्वासाठी, भगव्यासाठी आक्रमक होण्यास सिद्ध ! – हिंदु महासभा
पुण्यात हिजाब प्रकरणावरून हिंदु महासभेच्या वतीने भगवे उपरणे घालून आंदोलन
पुणे – कर्नाटकमध्ये मुसलमान समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालणार्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी महात्मा फुले वाड्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तर हिंदु महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र घालून पुण्यात कसबा गणपति समोरून मिरवणूक काढली. हिजाबला सुशिक्षित मुसलमान महिला समर्थन करत असतील, तर हिंदु सुशिक्षित महिलाही हिंदुत्वासाठी, भगव्यासाठी आक्रमक होण्यास सिद्ध आहेत. हिंदूंची मुले पण भगवे कपडे घालून विद्यालयात जातील. मुसलमान महिलांकडून हिजाबचे समर्थन होत असेल, तर आम्हीसुद्धा भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू, असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
१. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, हिजाबचा मुद्दा आपल्या राज्यात झालेला नाही, त्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील प्रश्नांविषयी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे योग्य नाही.
२. नाशिकच्या मालेगाव शहरात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘हिजाब दिवस’ पाळला जाणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ४० हून अधिक ठिकाणी हिजाबविषयी आंदोलने केली आहेत.