पितृपक्षात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप केल्यावर घराच्या आवारात औदुंबराची तीन रोपे समान अंतरावर आपोआप उगवणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्यानुसार वर्ष २०२० च्या पितृपक्षात (भाद्रपद मासात) आम्ही घरात प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप न चुकता करत होतो. एक मासाने माझ्या लक्षात आले, ‘घराच्या आवारात भिंतीच्या कडेला औदुंबराची तीन रोपे एकमेकांपासून समान अंतरावर आपोआप उगवली आहेत.’ तेव्हा मला वाटले, ‘तीन झाडे म्हणजे ‘ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश यांचे एकत्रित ‘दत्त’ स्वरूपाचे प्रतीक आहे.’ (खरेतर घराच्या आवारात झाडे आपोआप उगवण्याचे काहीही कारण नव्हते; कारण इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तिथे अशी झाडे आपोआप उगवली आहेत.)’ – श्रीमती श्यामला दादाजी देशमुख (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), नाशिक (२४.१०.२०२०)