दावणगेरे (कर्नाटक) पोलीस ठाण्यासमोर धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

  • इस्लामचा अवमान करण्यात आल्याच्या कथित पोस्टचे प्रकरण

  • धर्मांधांकडून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड !

  • कर्नाटकामध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे पोलिसांच्या वाहनांवर असे आक्रमण करण्याचे आणि पाकचे समर्थन करणार्‍या घोषणा देण्याचे धाडस कसे होते, असा प्रश्‍न उपस्थित होतो ! – संपादक
  • इस्लामचा कथित अवमान झाल्यावर धर्मांध संघटित होऊन विरोध करतात, तर हिंदू त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर निष्क्रीय रहातात ! – संपादक
(प्रतिकात्मक चित्र)

दावणगेरे (कर्नाटक) – दावणगेरे येथील हरिहरनगरमध्ये पोलीस ठाण्यासमोर धर्मांधांनी हिंसक आंदोलन करून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. या वेळी त्यांच्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मारुति नावाच्या व्यक्तीने सामाजिक माध्यमांतून इस्लामचा कथित अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात येत असतांना धर्मांधांनी पोलीस ठाण्याबाहेर गोळा होऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे चालू केले. त्यानंतर त्यांनी हिंसाचार केला.