हिजाब महत्त्वाचा भाग असल्याचे इस्लाममध्ये कुठेही लिहिलेले नाही ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
नवी देहली – इस्लाममध्ये कुठेही लिहिले नाही की, हिजाब हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. जर हिजाब महत्त्वाचा भाग आहे, तर संसदेत साडी नेऊन येणार्या मुसलमान महिला खासदारांनी धर्माचा अवमान केला आहे ?, असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपस्थित केला.