परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ईश्वरी सागर हजारे (वय १३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ईश्वरी सागर हजारे ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. ईश्वरी सागर हजारे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६३ टक्के पातळीची’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६४ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले )
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
माघ शुक्ल पक्ष नवमी (१०.२.२०२२) या दिवशी कु. ईश्वरी सागर हजारे हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. ईश्वरी हजारे हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सतत अनुसंधानात असणे
‘ईश्वरी वरकरणी अवखळ आणि खट्याळ वाटत असली, तरी तिची अंतर्मनातून सतत साधना चालू असते असे वाटते. तिचे नेहमी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान असते. ती तिच्या मनातील विचार त्यांना सांगते.
२. सूक्ष्मातील जाणीव
२३.१२.२०२० या दिवशी कु. ईश्वरीच्या आजोबांना (वडिलांच्या वडिलांना) देवाज्ञा झाली. त्यानंतर ५ – ६ दिवसांनी तिने आम्हाला सांगितले, ‘‘मी आजोबांशी सूक्ष्मातून बोलते.’’ तिचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते.
३. ‘सर्वांत अधिक उजेड देवापाशी असतो’, असे सांगणारी ईश्वरी !
एकदा वीजपुरवठा खंडित झाला होता. मी एका कामासाठी ‘अधिक उजेड कुठे आहे ?’, ते पहात होते. तेव्हा ईश्वरी मला म्हणाली, ‘‘सगळ्यात अधिक उजेड देवापाशीच असतो !’’ तिला ‘देवतांचे तेज, म्हणजे उजेड’, असे म्हणायचे होते.
४. वडिलांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ऐकून ईश्वरीचा भाव जागृत होणे आणि तिला त्या अनुभूती पुनःपुन्हा ऐकायला आवडणे
ईश्वरीचे वडील पूर्वी पूर्णवेळ साधना करत असतांना त्यांना गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला होता. तिचे बाबा तिला ते गुरुदेवांच्या समवेत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती सांगतात. त्या ऐकतांना तिचा भाव जागृत होतो आणि तिला आनंद होतो.’
-सौ. श्रुती सागर हजारे (ईश्वरीची आई), ढवळी, फोंडा, गोवा. (१८.५.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |