तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पुणे येथे सकल जैन समाजाचा मोर्चा !
पुण्यामध्ये उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दिले निवेदन
पुणे – तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत अहिंसाप्रेमी आणि परोपकारी जैन समाजाबद्दल काही दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यातील ‘सकल जैन संघ’ आणि ‘अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक युवक महासंघ’ यांनी पुण्याचे उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. या वेळी सकल जैन संघ, जैन युवक महासंघ, वीतराग सेवा संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज, यांच्यासह अभय छाजेड, प्रवीण चोरबोले, महेंद्र मरलेचा, सतीश शहा, विमल संघवी यांच्यासह जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित अचल जैन यांनी सांगितले की, एकीकडे संपूर्ण जग जैन समाजाच्या संस्कार आहाराच्या कल्पनेचे कौतुक करत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य –
|
अशातच महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम अहिंसाप्रेमी दुखावले आहेत. त्यामुळे खासदार मोईत्रा यांनी स्वत:चे वक्तव्य मागे घ्यावे आणि अहिंसा प्रिय जैन समाजाची क्षमा मागावी, ही जैन समाजाची इच्छा आहे.