कानशिवणी (जिल्हा अकोला) येथे ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाच्या पारायण सोहळ्याचे आयोजन !
कानशिवणी (जिल्हा अकोला) – येथे वै. शिवशंकरभाऊ पाटील शेगांव यांच्या स्मरणार्थ ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाच्या २१ व्या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणाला ७ फेब्रुवारी या दिवशी प्रारंभ झाला असून १५ मार्च या दिवशी सांगता सोहळा पार पडणार आहे. हे पारायण श्री गोपाल कृष्ण गोसेवा केंद्र या ठिकाणी करण्यात येत आहे. याच कालावधीत अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘गुरुवर्य भक्तराज महाराज आयोजन समिती’ आणि समस्त कानशिवणी ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.