पिस्तुलांची तस्करी करणार्या टोळीस अटक
मुंबई, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – डोंबिवली आणि कल्याण परिसरातून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणार्या ११ जणांना मुंबई आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १३ उच्च दर्जाची देशी बनावटीची पिस्तूले आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू असल्याची माहिती मुंबई आतंकवादविरोधी पथकाने दिली आहे.