सोलापुरात पोलिसांची अनुमती नसतांनाही एम्.आय.एम्. पक्षाच्या महिलांचे आंदोलन
एम्.आय.एम्. पक्षाला मुसलमान महिलांची एवढीच काळजी वाटते, तर त्याने महिलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक
सोलापूर – कर्नाटक येथे महाविद्यालयांत हिजाब घालून प्रवेश करण्याविषयी मुसलमान विद्यार्थीनींनी मागणी केल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद सोलापुरातही उमटले. येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या महिलांनी पोलिसांची अनुमती नसतांनाही ९ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली, तसेच ‘प्रहार संघटने’च्या वतीने विजापूर रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या आंदोलकांना कह्यात घेतले असून शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(सौजन्य : G9 मराठी News)
या वेळी ‘मुसलमान समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे’, असा आरोप रेश्मा मुल्ला यांनी केला. (एरव्ही हिंदुत्वनिष्ठांना कायद्याचा धाक दाखवणारे पोलीस अनुमती नसतांनाही आंदोलन करणार्या महिलांवर पोलीस कोणती कठोर कारवाई करणार आहेत ? – संपादक)