जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातून बाळाला पळवून नेणार्या महिलेस पोलिसांनी पकडले !
जालना – जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूत झालेल्या मातेच्या नातेवाइकांचा विश्वासघात करून बाळाला पळवून नेणार्या महिलेस पोलिसांनी अवघ्या १२ घंट्यांतच पकडून बाळालाही सुखरूप आणले. जन्मानंतर अवघ्या १२ घंट्यांचे हे बाळ चोरीला गेल्याच्या घटनेने मातेला मोठा धक्का बसला होता. ६ फेब्रुवाच्या रात्री ९ वाजता प्रसूत झालेल्या मातेचे बाळ दुसर्या दिवशी सकाळीच जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका अनोळखी महिलेने पळवून नेले होते. ९ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजता सेलू शहरातील गायत्रीनगर येथून बाळासह आरोपी महिलेस पोलिसांनी कह्यात घेतले.
सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ३ कॅमेरे लावणार आहोत, तसेच सुरक्षा रक्षकांनाही सतर्क रहाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णसेवेसमवेतच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले. (या उपाययोजना आधीच का केल्या नाहीत ? – संपादक)