(म्हणे) ‘बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब आदी घालण्याचा महिलांना अधिकार !’ – प्रियांका वाड्रा
प्रियांका वाड्रा म्हणतात, तसा अधिकार कुणीही नाकारत नाही. प्रश्न केवळ महाविद्यालयांमध्ये नियमानुसार गणवेश घालून येण्याचा आहे. जर प्रियांका वाड्रा यांना वाटते की, नियमभंग करून महाविद्यालयात हिजाब घालून जाणे योग्य आहे, तर त्यांनी तसे त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे घोषित केले पाहिजे !
बिकिनी, घुंघट, जीन्स कुठे आणि कधी घालावे, याचे काही नियम समाजाकडून पाळले जात आहेत. तसे ते कुठे घालू नयेत, हेही नियम काही संस्थांनी अन् सरकारने केले आहेत. सरकारी अधिकारी जीन्स घालून येऊ शकत नाहीत, हे प्रियांका वाड्रा यांना ठाऊक असेलच ! त्यामुळे हिजाब महाविद्यालयात घालायचा नाही, असा नियम असेल, तर तो पाळलाच पाहिजे !
शाळेतील हिजाबवर बंदी घालणे अयोग्य असल्याची भाषा करणार्या प्रियांका वाड्रा कॉन्वेंट शाळांमध्ये हिंदु मुलींनी हातांवरील मेंदी, कानातले घालणे आदींवर असलेल्या बंदीवर कधीच का बोलत नाहीत ? यातून वाड्रा यांचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा स्पष्ट होतो !
नवी देहली – ‘बिकिनी’ (महिलांचे अंतर्वस्त्र) असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे, हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा, असे ट्वीट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर केले आहे.