भारतातील आतंकवादी कारवाया आणि त्यावरील एकमात्र उपाययोजना !
भारतातील आतंकवादी कारवाया संपवण्यासाठी पाकलाच जगाच्या नकाशावरून कायमचे पुसायला हवे !
१. राजधानी देहलीतील बाजारात स्फोटके सापडणे आणि पाकिस्तानमधून भारतात पाठवलेल्या २४ बाँबपैकी एक बाँब त्यात असून देशात विध्वंस घडवण्याचा उद्देश असणे
‘१५ जानेवारी २०२२ या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानपत्रात एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात म्हटले होते, ‘राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारात ‘आईडी’ स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. ही माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस दल, आतंकवादविरोधी पथक आणि बाँबनाशक पथक यांच्यासह अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोचल्या. स्फोटके निकामी करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पोलिसांनी ‘ही स्फोटके गाझीपूर येथील बाजारात कशी आली ?’, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात् स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांच्या कालावधीत हे नेहमीच घडते. या स्फोटकांविषयी १४ जानेवारी २०२२ या दिवशी सकाळी पोलिसांना दूरभाषवरून माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम चालू केली. जर दूरभाष आला नसता, तर ही स्फोटके फुटून मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी झाली असती. १८ जानेवारी २०२२ या दिवशी देहली पोलिसांनी सांगितले की, हा बाँब पाकिस्तानमधून भारतात पाठवलेल्या २४ बाँबपैकी एक होता. हे बाँब भारतात विध्वंस घडवण्यासाठीच पाठवण्यात आले होते. यापूर्वी पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथेही स्फोटके सापडली होती. स्फोटकांशी संबंधित असणारी उपकरणे जप्त करण्यात आली होती.
२. गाझीपूर येथे स्फोटके ठेवण्यामागे गुन्हेगारी टोळ्या आणि ‘स्लीपर सेल’ यांचा हात असल्याचा संशय
एका वृत्तानुसार ‘स्फोटके आणि काही उपकरणे भारतात तस्करीच्या माध्यमातून आली असावीत’, असा कयास अन्वेषण यंत्रणांनी बांधला. गाझीपूरमध्ये ३ किलो आर्.डी.एक्स्., न्यूक्लियर चार्ज आणि सेकंडरी चार्ज म्हणून अमोनियम नायट्रेट होते. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर देहली किंवा देशातील अन्य ठिकाणे येथे कुठे स्फोटके आहेत का ? याचाही शोध घेतला. गाझीपूरमधील स्फोटकांमध्ये टायमर आणि ‘एबीसीडी स्विच’ (आतंकवाद्यांकडून बाँबसाठी वापरण्यात येणारे एक उपकरण) लावण्यात आले होते. विशेष म्हणजे पाकिस्तान हा ‘एबीसीडी स्विच’चा निर्माता आहे. काश्मीर आणि अफगाणिस्तान येथील आतंकवादी हे बाँबस्फोटांसाठी प्रामुख्याने या ‘एबीसीडी स्वीच’चा वापर करतात. ‘एबीसीडी स्विच’ आणि ‘टायमर’ यांचा वापर करून स्फोट घडवण्याची वेळ काही मिनिटांपासून ६ मासांपर्यंत निश्चित केली जाते.
१४ जानेवारी या दिवशी गाझीपूरसमवेतच श्रीनगर आणि अटारी येथेही स्फोटके सापडली. देहलीत सापडलेली स्फोटके आणि गेल्या काही काळापासून पंजाबमध्ये सापडत असलेली स्फोटके यांत साम्य आढळले आहे. त्यामुळे ही स्फोटके पंजाबमार्गे आली आहेत का ? याचेही अन्वेषण यंत्रणा करत आहेत. वर्ष २०२१ मध्ये केवळ पंजाबमध्ये अशी स्फोटके आढळून आली होती. यासमवेतच काश्मीरमध्येही ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ पाठवले जात असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. गाझीपूर येथे स्फोटके ठेवण्यामागे उत्तरप्रदेशच्या गुन्हेगारी टोळ्या आणि ‘स्लीपर सेल’ यांचा हात असल्याचा संशय आहे.
३. विदेशातही भारतीय वंशाच्या लोकांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात !
जानेवारी २०२२ मध्ये आतंकवाद्यांनी अबू धाबी येथील विमानतळालगत ३ स्फोट केले आणि तेलाच्या ३ टँकरवर बाँब टाकले. यात भारतीय वंशाच्या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सणांच्या वेळी पाकिस्तानमधून ठरवून स्फोटके पाठवली जातात आणि स्फोट करण्याचे प्रयत्नही केले जातात. अटकेत असलेल्या आतंकवाद्यांनीही त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचे मान्य केले आहे.
४. भारतात निवडणुकीच्या काळात खलिस्तान्यांकडून आतंकवादी कृत्य होण्याची शक्यता
२६ जानेवारी २०२१ या दिवशी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने खलिस्तानी समर्थकांनी देहलीत पुष्कळ गोंधळ घातला होता. त्यानंतर धर्मांधांनी देहलीत दंगलीही घडवल्या. नुकतेच एक वृत्त आले की, पंजाबात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचे कारस्थान पाकची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ने रचले आहे. भारतात निवडणुकीच्या काळात खलिस्तान्यांकडून आतंकवादी कृत्य होण्याची शक्यता आहे.
५. आतंकवाद्यांना पोसणारा भारत !
माध्यमांनुसार, पाकिस्तानी आणि खलिस्तानी आतंकवादी प्रत्येक वेळी कुठले तरी निमित्त काढून भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा या बब्बर खालसा, इंटरनॅशनल खलिस्तानी कमांडो फोर्स, यूथ फेडरेशन यांसारख्या अनेक आतंकवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथेही निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेशात निवडणुका घेणे एवढे सोपे नसते.
प्रत्येक आतंकवादी कृत्य हे पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच होते. त्यानंतर आतंकवाद्यांना पकडून त्यांच्यावर तुटपुंजी कारवाई केली जाते, त्यांच्या विरोधात खटले भरले जातात आणि त्यांना वर्षानुवर्षे कारागृहात पोसले जाते. तसेच न्यायालयीन लढाईसाठी करदात्यांच्या पैशातूनच त्यांना मोठमोठे अधिवक्ते दिले जातात. अनेक दशकांनी त्यांना फासावर लटकवले जाते, हे सर्व आपण पहातच आलो आहोत.
६. भारताने पाकविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून इस्रायलसारखे धोरण अवलंबावे !
‘अण्वस्त्रांचा वापर करून पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट केले पाहिजे, म्हणजे भारताची कायमची डोकेदुखी दूर होईल’, हा विचार प्रत्येक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकाच्या मनात आहे. फाळणीच्या वेळी धर्मांधांना स्वतंत्र राष्ट्र दिले, तरीही त्यांचा हिंदुद्वेष थांबला नाही. ना त्यांच्या एकेकाळच्या मातृभूमीविषयीचा त्यांचा द्वेष संपला, ना हिंदूंविषयीचा द्वेष संपला. त्यामुळे भारताने पाकविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून इस्रायलसारखे धोरण अवलंबावे.
७. एकेका आतंकवाद्याला मारण्यापेक्षा त्यांना निर्माण करणार्या पाकिस्तानलाच कायमचे संपवावे !
भारताविरुद्ध प्रचार केल्याप्रकरणी पाकमधून चालवण्यात येणार्या ३५ ‘यू ट्यूब’ वाहिन्या, २ इन्स्टाग्राम खाती, २ ट्विटर खाती, २ फेसबूक खाती आणि २ संकेतस्थळे यांवर बंदी घालण्यात आली. ही बंदी घालण्यापूर्वी ‘त्यांवरील बातम्या आणि ध्वनीफीती पहाणार्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे’, असे समजले. माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव विक्रम म्हणाले, ‘‘ही सर्व खाती आणि वाहिन्या यांवरून भारतीय सैन्यदले अन् जम्मू-काश्मीरमधील कथित अत्याचार यांच्याविषयी खोडसाळ प्रचार करण्यात येत होता, तसेच फुटीरतावादी विचारसरणीला खतपाणी घालून कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे कामही केले जात होते.’’
काही दिवसांपूर्वी वृत्त आले की, पाकिस्तानने भारताशी पुढील १०० वर्षे युद्ध न करण्याचे धोरण अवलंबले आहे; मात्र आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये पाकने भारताकडून सपाटून मार खाल्याने त्याचे थोबाडच फुटले आहे. तो भारताशी समोरासमोर युद्ध करू शकत नाही. असे असले, तरी भारताशी आतंकवादी कृत्ये आणि दंगली यांच्या माध्यमांतून पाकिस्तान सतत अघोषित युद्ध लढतच राहील. त्यामुळे जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.
पाकिस्तानने दाऊद इब्राहिम, धर्मांध आणि राष्ट्रविरोधी लोक यांना हाताशी धरून भारतात वर्ष १९९३ अन् त्यानंतर (आतापर्यंत) अनेक ठिकाणी बाँबस्फोट केले. त्यात सहस्रो लोकांना प्राण गमवावा लागला, तर सहस्रो नागरिक घायाळ झाले. या आक्रमणांचे व्रण त्या घायाळांना आजही त्या भयावहतेची आठवण करून देतात. भारतीय न्यायव्यवस्था जीवघेणी आतंकवादी आक्रमणे करणार्यांनाही ५ ते २० वर्षे जीवदान देते. पाकिस्तानने पोसलेल्या एका आतंकवाद्याने मुद्रित संदेशाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातील एका अधिवक्त्याला धमकी दिली होती. त्यामुळे आतंकवाद्यांना एकेक करून मारण्यापेक्षा आता संपूर्ण पाकिस्तानलाच संपवून टाकले, तर गेली ७५ वर्षे चालू असलेली भारताची डोकेदुखी पूर्णतः संपेल.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२.२.२०२२)