(म्हणे) ‘हिजाबच्या विषयाला महत्त्व देऊ नका !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
जे हिजाब घालतात, त्यांना गृहमंत्री हे का सांगत नाहीत ? – संपादक
मुंबई – महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून चालू असलेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत; परंतु या विषयाला महत्त्व न देण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करून केले आहे.
माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये. (2/2)#HijabRow
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) February 8, 2022
कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून चालू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत.
Hijab row: Maha HM Patil calls for peace, says 'don't stage unnecessary protests here' https://t.co/M8r4zLtnWj
— Republic (@republic) February 10, 2022
कर्नाटक उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे. धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.