‘महाविद्यालय अभ्यास आणि हिजाब यांपैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे !’ – नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफजई

  • मलाला हिच्यावर तालिबानने इस्लामनुसार न वागल्यानेच गोळीबार केला होता, हे ती कशी काय विसरते ? अशी कट्टरता आणि धर्मांधता तिला आता कशी काय चालते ? कर्नाटक हे भारतात आहे, तालिबानी अफगाणिस्तानमध्ये नाही, हे तिने कायमच लक्षात ठेवायला हवे आणि भारताच्या प्रकरणात तोंड खुपसू नये ! – संपादक
  • जर कर्नाटकातील मुसलमान विद्यार्थिनींना नियम मोडून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालायचा असेल, तर त्यांनी तालिबानी अफगाणिस्तानमध्येच चालते व्हावे, असे कुणी राष्ट्रप्रेमी आणि नियमांचे पालन करणार्‍या भारतियाने म्हटल्यास चुकीचे कसे ठरेल ? – संपादक
डावीकडे मलाला युसूफजई

नवी देहली – नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिने कर्नाटकात चालू असलेल्या हिजाबच्या प्रकरणी विधान केले आहे. ट्वीट करून मलालाने म्हटले की, महाविद्यालय आम्हाला अभ्यास आणि हिजाब यांपैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे, हे भयावह आहे. तोकडे किंवा अधिक कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुसलमान महिलांना न्यून लेखणे थांबवावे.