स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधानकारक नाही !  

माद्रीद (स्पेन) – स्पेनच्या सरकारने देशात मास्क घालणे बंधनकारक नसल्याचे घोषित केले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री कॅरोलिना डारियास यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. १० फेब्रुवारी २०२२ पासून हा निर्णय लागू होणार आहे. यापूर्वी जून २०२१ मध्ये सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यावरील अनिवार्यता रहित केली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्यावर २३ डिसेंबर २०२१ ला पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रभाव न्यून झाल्याने पुन्हा हा नियम रहित करण्यात आला आहे.