कवी महंमद इक्बाल यांचेही पूर्वज हिंदू असणे आणि इक्बाल यांनी मुस्लिम लीगचे अध्यक्ष असतांना ब्रिटिशांकडे मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करणे !
धर्मांतर नव्हे, राष्ट्रांतर !
‘मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेश असावा’, ही कल्पना डोक्यात सर्वांत प्रथम निर्माण झालेले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताची रचना करणारे महंमद इक्बाल हेही पूर्वीचे हिंदूच. त्यांचे पूर्वज सप्रू आडनाव असणारे काश्मिरी ब्राह्मण होते; पण त्यांचे पूर्वज धर्मांतरित हाेऊन त्यांनी इस्लाम स्वीकारला.
इक्बाल यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील सियालकोट येथे वर्ष १८७७ मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू फाळणीपूर्वीच म्हणजे वर्ष १९३८ मध्ये झाला; पण इक्बाल वर्ष १९३० मध्ये ‘मुस्लिम लीग’चे अध्यक्ष असतांना त्यांनी मुसलमानांसाठी ब्रिटीश साम्राज्यांतर्गत अशा स्वायत्त प्रदेशाची मागणी केली होती. पुढे याच मागणीचे रूपांतर मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाच्या मागणीत होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली.’
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ